Saturday, 15 May 2021

ब्लॉग म्हणजे काय? What is Blog in Marathi

इंटरनेट च्या युगात लोकांना व्यक्त होण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्या मधील आपले विचार व ज्ञान जगासमोर मांडण्याची ब्लॉगिंग हे खूप लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहेत. आपल्याला ज्या विषयाची आवड आहे तो विषय घेऊन आपण ब्लॉग लिहून तो जगासमोर मांडू शकता.

ब्लॉगिंग सुरु करण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. त्या पैकी योग्य प्लॅटफॉर्म वापर करून तुम्ही स्वतःचा ब्लॉग सुरु करू शकता. म्हणूच या पोस्ट मध्ये ब्लॉगिंग बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहो. त्यामध्ये ब्लॉग म्हणजे काय? (What is Blog in Marathi) व ब्लॉग कसा सुरु करायचा याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत.


डिजिटल मार्केटिंग, ब्लॉगिंग आणि नवनवीन टेकनॉलॉजि ची माहिती साठी आमच्या साईट भेट द्या - https://www.marathispirit.com/


तर चला पाहूया ब्लॉग म्हणजे काय?



ब्लॉग म्हणजे काय? | What is Blog in Marathi


ब्लॉग म्हणजे आपले विचार व ज्ञान जगासमोर मांडण्यासाठी ब्लॉगिंग हे उत्तम माध्यम आहे, आपल्याला ज्या विषयाची आवड आहे त्या विषयावर आपण ब्लॉग लिहू शकतो.


ब्लॉग म्हणजे इंटरनेट च्या साहाय्याने आपल्याला कोणतीही माहिती अगदी काही कालावधीत मिळते. तसेच कमी वेळात मौल्यवान माहिती मिळते आणि राहिलेल्या वेळात दुसरी कामे होतात.


Blogging Type in Marathi | ब्लॉगिंग चे प्रकार


या ब्लॉगिंग दोन प्रकार येतात - 


  1. पर्सनल ब्लॉगिंग | Personal Blogging 

  2. प्रोफेशनल ब्लॉगिंग | Professional Blogging. 


या व्यक्तिगत ब्लॉगिंग मध्ये ज्या व्यक्तींना लिहण्याची आवड किंवा त्यांना त्यांचा अनुभव शेअर करायचा असतो अशा व्यक्ती पर्सनल ब्लॉगिंग करतात. अश्या व्यक्तींचा ब्लॉगिंग मधून पैसे कमावण्याचा हेतू नसतो, फक्त ते व्यक्ती आवड म्हणून ब्लॉगिंग करत असतात.


व्यक्तिगत ब्रॅण्डिंग ब्लॉगिंग मध्ये ब्लॉगर स्वतः ला एका ब्रँड च्या स्वरूपात प्रदर्शित करतो, तो त्याच्या ब्लॉग मध्ये विविध प्रकारच्या सेवा जसे कि मार्गदर्शन करणे, आपल्या ब्लॉग द्वारे ज्ञान प्रदान करणे व ई बुक्स इत्यादी प्रकारच्या सेवा प्रदान करतो.


ब्लॉग कसा सुरु करायचा | How to Start Blog in Marathi


1. ब्लॉग चा विषय निवडणे -


स्वतः चा ब्लॉग सुरु करण्यासाठी सर्वात प्रथम ब्लॉगचा विषय निवडणे गरजेचे असते, जर आपल्याला एखाद्या विषयामध्ये रस आहे व त्या विषयाबद्दल आपल्याला खूप माहिती असेल तर आपण ब्लॉग लिहून आपले विचार मांडू शकतो.


2. योग्य डोमेन नेम


ब्लॉग सुरु करण्यासाठी विषय निवडल्यावर आपल्याला योग्य डोमेन नेम घेणे महत्वाचे असते. डोमेन नेम हा वेबसाईटचा पत्ता (Address) असतो, जो लोक आपल्या वेब साइटला भेट देण्यासाठी Browser च्या URL मध्ये टाईप करतात.



पूर्ण माहिती वाचा - डोमेन नाव म्हणजे काय? व डोमेन नेम चे प्रकार


  • डोमेन नाव कसे असायला पाहिजे हे आपण पुढीलप्रमाणे पाहूया.
  • डोमेन नाव हे उच्चार करण्यास अगदी सोपे असायला हवे.
  • किमान डोमेन नाव हि कमीत कमी वर्ड चे असायला हवे.
  • डोमेन नाव असे असावे कि त्यामुळे आपला ब्लॉग कशासंदर्भात आहे हे समजेल.

3. होस्टिंग


डोमेन नेम घेतल्यानंतर आपल्याला वेबसाईट साठी होस्टिंग ची सुद्धा गरज असते, म्हणून योग्य प्रकारची होस्टिंग खरेदी करायला हवे.


पूर्ण माहिती वाचा - वेब होस्टिंग म्हणजे काय?


होस्टिंग महत्वाचे प्रकार

  • सामायिक वेब होस्टिंग (Shared Hosting)
  • आभासी खाजगी वेब होस्टिंग (VPS Hosting)
  • समर्पित वेब होस्टिंग (Dedicated Server)

4. आकर्षित थिम ची निवड करणे


आकर्षित थिम निवडून व त्याचे योग्य प्रकारे सेट उप करून आपला ब्लॉग आकर्षक बनवू शकतो.


वरील काही स्टेप्स फोल्लो करून तुम्ही तुमचा ब्लॉग सुरु करू शकता, व त्यामधून पैसे कमवू शकता. अधिक माहिती साठी तुम्ही आमच्या ब्लॉग पोस्ट ला भेट देऊ शकता.





No comments:

Post a Comment

Social Media बद्दल सविस्तर माहिती

सोशल मीडिया हा एक प्रकारचा एकमेकांशी संवाद साधण्याचा सर्वात सोपा आणि सुलभ प्लॅटफॉर्म आहे. सोशल मीडिया हा एक लोकप्रिय प्लैटफॉर्म आहे.  सोशल म...